आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन:श्री क्षेत्र अश्वलिंग मंदिराजवळील वनक्षेत्र; पिंपळवंडीत वनक्षेत्रात झाडे लावून पर्यावरण दिन साजरा

पिंपळवंडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील श्री क्षेत्र अश्वलिंग मंदिराजवळील वनक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी वनपाल एल.बी.पवार हजर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार बबनराव उकांडे, भाऊसाहेब पवार, चंद्रकांत पवार, अविराज पवार वनकर्मचारी अंगद भोसले हे हजर होते.

वनपाल साधू धसे व वनरक्षक बद्रीनाथ परजणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, बदलत्या काळात पर्यावरणात वाढत चाललेला कार्बन डाय-ऑक्साईड सध्या सर्वांचा डोकेदुखी बनत चाललेला आहे. पर्यावरणाचे महत्व उमजावे, यासाठी जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो.

यामागील मुख्य उद्देश म्हणजे की जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला वनरक्षक नवनाथ काकडे, राठोड, शेळके, आघाव, शिवाजी आघाव, अंबादास लवांडे, सदाशिव पवळ, रामेश्वर बेद्रे, ए.ए सातपुते, सत्तार शेख, सोपान येवले, शहादेव पवार, दिलीप शहाणे, शेख बशीर, दत्तात्रय येवले आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...