आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबन:अधिवेशनात झाली होती घोषणा; तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. गुट्टेंचे अखेर निलंबन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यावर अखेर शासनाने निलंबनाची कारवाई केली. बुधवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले. सोमवारीच त्यांनी बीड मुख्याधिकारीपदावरून बदली केली गेली होती. बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे हे कायम वादग्रस्त राहिले होते. बीड नगरपालिकेबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले गेले होते.

यामध्ये, मुख्याधिकारी गुट्टे यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली हाेती. मात्र, त्याबाबतचे आदेश आले नव्हते. दरम्यान, सोमवारी गुट्टे यांची बीड पालिकेतून परभणी मनपामध्ये उपायुक्त म्हणून बदली झाली होती. अखेर, बुधवारी शासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. बीडमधील त्यांची कारकीर्द कायम वादात राहिली. त्यांच्यावर पक्षपातीपणा व भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांचे अखेर निलंबन झालेले आहे.

चार जणांचीही होणार आता विभागीय चौकशी
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विनायक मेटे यांनी या प्रकरणी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर विधान परिषद सभागृहात २१ मार्च २०२२ रोजी चर्चा झाली होती. या चर्चेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन विभागाचे सहायक कर अधीक्षक सुधीर जाधव, बीड नगर पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता राहुल टेकाळे, बीड नगरपालिकेचे बांधकाम अभियंता योगेश हाडे, कनिष्ठ रचना सहायक सलीम सय्यद याकूब यांना निलंबित करण्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिले होते.

दरम्यान, शासनाच्या उपसचिव विद्या हम्पय्या यांनी नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबईचे आयुक्त यांच्या नावे बुधवारी (१ जून) पत्र काढून बीड नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना आदेशाच्या दिनांकापासून तातडीने निलंबित करण्याची कार्यवाही करून त्यांची विभागीय चौकशी करून त्या बाबतचा अहवाल राज्य शासनास सादर करण्यात यावे, असे म्हटले आहे. त्यामुळे या अहवालाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...