आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:माजलगावात चौघांना चार‎ दिवसांची पोलिस कोठडी‎

माजलगाव‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भाजप कार्यकर्ते अशोक‎ शेजूळ यांच्यावरील प्राणघातक‎ हल्ला प्रकरणी अटक चार‎ हल्लेखोरांना शनिवारी माजलगाव‎ पोलिसांनी न्यायालयात हजर केले.‎ त्यांना चार दिवस म्हणे १४ मार्च‎ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे‎ आदेश न्यायालयाने दिले आहेत.‎ शहरातील व्यापारी महासंघाचे‎ उपाध्यक्ष तथा भाजपचे कार्यकर्ते‎ अशोक शेजुळ यांच्यावर ७ मार्च‎ रोजी प्राणघातक हल्ला केला होता.‎

याप्रकरणी माजलगाव ठाण्यात जीवे‎ मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी‎ गुन्हा दाखल होता. पोलिस‎ प्रशासनाने तीन दिवस कसून तपास‎ केला असता यातील अविनाश‎ बाळासाहेब गायकवाड, संदिप बबन‎ शेळके, सुभाष बबन करे,शरद‎ भगवान कांबळे सर हल्लेखोरांना‎ पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेने‎ यश मिळवले.‎ शनिवारी दुपारी १ वाजता चारही‎ आरोपींना माजलगाव न्यायालयात‎ हजर केले. यावेळी प्रथम वर्ग‎ न्यायदंडाधिकारी आर.बी. पौळ‎ यांनी आरोपी माजलगाव यांना चार‎ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली‎ आहे. माजलगाव शहर पोलिस‎ अधिक तपास करत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...