आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैशासाठी अल्पवयीन मुलांचे अपहरण करून विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर परभणी पोलिसांनी या प्रकरणातील सहभागी आणखी चार आरोपींना अटक केली. आरोपींकडून एका अपहृत बालकाचा शोध लागला आहे. रुद्रेश हरिश्चंद्र वारंग (रा. ठाणे), सुमन पुडी लक्ष्मी दुर्गा (रा. कोकाडपल्ली, हैदराबाद), सिलमप्रभा अनिल (रा. भद्रादी कोथागुडेम) इटी त्रिनाथ व्यंकटराव (रा. विजयवाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती परभणी पोलिसांनी दिली.
परभणीतील अजमेरी कॉलनी येथील रहिवासी मोहंमद युसूफ मोहंमद हैदर यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यात चार वर्षे ३ महिन्यांच्या मुलांचे अपहरण झाल्याचे म्हटले होते.
सफिया बेगम अर्शद खान यांनीही त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार १ मार्च २०२२ रोजी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत दोन्ही गुन्ह्यांतील बालकाचे अपहरण अजमेरी कॉलनीतील महिला सुलताना ऊर्फ परवीनबी शेख सादेक अन्सारी हिने केल्याचे तपासात स्पष्ट झाले. तिला बहीण नूरजहाँ बेगम मोहंमद इब्राहिम शाकेर व तिचा विधिसंघर्षग्रस्त बालक मदत करत होते. पोलिसांनी यापूर्वी दहा आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष आहेत. आरोपीकडून दोन बालकांचा पोलिसांनी शोध लावून ताब्यात घेतले आहे. त्यांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले केले असल्याची माहिती परभणी पोलिसांकडून देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.