आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाकडून छेड:बीड येथील चौथीच्या विद्यार्थिनीची शिक्षकाकडून छेड; शिक्षकाला चोप

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाने शुक्रवारी चौथीच्या मुलीची छेड काढली. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी शनिवारी स्कूलमध्ये येऊन शिक्षकाला चोप दिला. घटनास्थळी जाऊन शिवाजीनगर ठाण्यातील पोलिसांनी माहिती घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शहरातील एका इंग्लिश स्कूलमध्ये शु्क्रवारी चौथीच्या वर्गात इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र हे विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने (४०) विद्यार्थिनीची छेड काढली. या प्रकाराची माहिती विद्यार्थिनीने घरी दिली. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास विद्यार्थिनीसह नातेवाईक स्कूलमध्ये आले. संबंधित शिक्षकास समोर बोलवा, अशी मागणी करत स्कूलचे प्राचार्य, संस्थाचालकांकडे ठिय्या मांडला. संबंधित शिक्षकाला बोलावून घेताच त्याला नातेवाइकांनी चोप दिला. स्कूलमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्राचार्यांनी पोलिसांनी माहिती देऊन बोलावून घेतले. शनिवारी उशिरापर्यंत शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संबंधित शिक्षक बडतर्फ
शिक्षकाकडून घडलेला प्रकार निंदनीय आहे. याची माहिती कळताच आम्ही शिक्षकास स्कूलमधून बडतर्फ केले आहे. संबंधित शिक्षक स्कूलमध्ये सहा महिन्यांपासून कार्यरत होता. स्कूल प्रशासनाकडून अशा गंभीर प्रकरणात कठोर भूमिका घेतली जाईल. - एस.एस. सर्वज्ञ, प्राचार्य, बीड.