आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरूर तालुक्यातील पाडळी येथे सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसाट यांच्या जन्मदिनी आयोजित आरोग्य शिबिरात ग्रामीण भागातील एक हजारांहून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यासह विविध आजारांवरील ४ लाख रूपयांच्या औषधींचे वाटप करण्यात आले. शिबिरातून आढळलेल्या ९० रुग्णांवर मोतीबिंदू, ऱ्हदयरोग व इतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील गरजू रुग्णांच्या आरोग्य सेवेत पैशांअभावी खंड येऊ नये, यासाठी पाडळी येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. विवेकानंद हॉस्पिटल, जालना यांच्या पुढाकारातून हे आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महंत राधाताई महाराज सानप, कोविडयोध्दा विजयसिंह बांगर, पत्रकार भागवत तावरे, संतोष ढाकणे, डॉ.माधव सानप, डॉ.श्रीमंत मिसाळ, डॉ.राजकुमार सचदेव, डॉ.रोहित कासट, डॉ.सतीश गोयल, डॉ.माधुरी पाकनीकर, डॉ.गिरीश पाकनीकर, डॉ.रामेश्वर सानप, डॉ.चारूदत्त हवालदार, डॉ.चारुस्मिता हवालदार, डॉ.अनिल कायंदे, डॉ.पूजा कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या प्रारंभी डॉ.श्रीमंत मिसाळ यांनी सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसट यांचे गरजूंसाठी असलेले प्रयत्न हे भगीरथ आहेत. यापुढेही त्यांच्या साथीने ग्रामीण भागात अशीच मोफत आरोग्य सेवा देणार असल्याचा संकल्प डॉ.मिसाळ यांनी केला. कोविडयोध्दा विजयसिंह बांगर यांनी कोविडकाळातील विविध आठवणी सांगतानाच अशा प्रकारचे आरोग्य शिबिर उपयुक्त असल्याचे याप्रसंगी बोलताना सांगितले.
माउली सिरसट हे आधुनिक काळातील श्रावणबाळच
गरजूंना मदत करत माऊली सिरसाट हे आधुनिक काळातील श्रावणबाळ ठरत आहेत. हजारो रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचे काम त्यांनी केले. कोरोना काळात भाऊ भावाला विचारत नसताना माऊली यांनी २४ तास रुग्णालयात राहून चांगले उपचार मिळवून दिले, असे प्रतिपादन महंत राधाताई महाराज सानप यांनी केले. दरम्यान, या शिबिरास नेत्रतज्ज्ञ डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. तसेच आरोग्य चळवळीचा हा यज्ञ असाच अविरत सुरू राहावा, असे आवाहन तात्यासाहेब लहाने यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.