आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी शिबिर:आनंदऋषीजी नेत्रालयाच्या वतीने‎ मोफत तपासणी शिबिर सुरू‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील श्री आनंदऋषीजी नेत्रालयाच्या‎ वतीने स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक‎ प्रतिष्ठानच्या मार्फत होत असलेल्या २१ व्या‎ राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे औचित्य साधून‎ मोफत नेत्रतपासणी शिबिर ३१ डिसेंबर रोजी सुरु‎ झाले आहेत. १० जानेवारी पर्यंत हे शिबिर सुरु‎ राहणार आहे. शिवाय, रक्त, लघवी यांचीही‎ तपासणी करण्यात येणार असून काही चाचण्या या‎ सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत.

या शिवाय,‎ नेत्रशस्त्रक्रियांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांवर‎ अल्पदरात शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची‎ माहिती आनंदऋषीजी नेत्रालय आणि स्व.‎ झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने‎ देण्यात आली असून या शिबिराचा जिल्ह्यातील‎ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही केले गेले‎ आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या‎ तपासण्या होणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...