आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:पालावरील बालकांची मोफत आरोग्य तपासणी

अंबाजोगाई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत शहर परिसरातील पालावरच्या बालकांची आरोग्य तपासणी केली. यासह आवश्यक औषध-गोळ्याही उपलब्ध करून देण्यात आल्या.

मिशन पिंक हेल्थ अंतर्गत झोपडपट्टीमधील मुलींचे हिमोग्लोबिन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. आयएमए अंबाजोगाईच्या वतीने या दृष्टीने जनजागृती करण्यात आली. यासह गरीब, गरजू लोकांसाठी कोविड काळात अन्नधान्य कीट वाटप, सरकारी कोविड रूग्णालयात आयएमए डॉक्टर्सनी मोफत सेवा दिली. कोविड काळात कोविड जनप्रबोधन वा कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित लोकांसाठी “ऑक्सिगान”हा संगीत रजनी कार्यक्रम आयएमए अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी राबवला होता.

आता कोविडपश्चात ही सामाजिक सेवा नव्या जोमाने पुढे नेते डॉ.राजेश इंगोले यांच्या व त्यांचे सहकारी उपाध्यक्ष डॉ.विजय लाड, सचिव डॉ.सचिन पोतदार, कोषाध्यक्ष डॉ.राहुल डाके, डॉ.बळीराम मुंडे, डॉ.श्रीकृष्ण गित्ते, डॉ.अविनाश मुंडे हे मूर्त स्वरूप देण्याचे काम करीत आहेत. डॉ.राजेश इंगोले यांनी शिकलकरी वस्ती, गिरी वस्ती, पारधी पाल या ठिकाणी जाऊन पालावरच्या गोरगरीब विद्यार्थ्यांची, बालकांची आरोग्य तपासणी केली.

बातम्या आणखी आहेत...