आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सर्पराज्ञी वन्यजीव उपचार केंद्र अद्यापपर्यंत तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील जखमी व आजारी वन्यजीवांना जीवदान प्राप्त करून देणारे केंद्र ठरलेले आहे. हजारो वन्यजीवांना येथे पुन्हा उंच भरारी घेण्याची ताकद या ठिकाणी मिळाली. या वन्यजीव उपचार केंद्राला शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत प्राप्त होत नाही. शिरूर कासार शहरातील जमीर बागवान हा फळ विक्रेता गेल्या २२ वर्षापासून येथील वन्यजीवांना अन्न पुरवतो आहे. तागडगाव येथील डोंगरावर सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे हे दांपत्य सर्परांनी वन्यजीव उपचार केंद्र गेल्या २२ वर्षापासून चालवत आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो जखमी वन्यजीवांवर सुश्रूषा करण्याचे काम केले जाते. जखमी वन्यजीवांना सांभाळणे खूप अवघड असल्याने प्रकल्प चालक सिद्धार्थ सोनवणे यांनी शिरूर कासार शहरातील फळ विक्रेते जमीर बागवान यांना मदतीचा हात देण्याची विनंती २२ वर्षांपूर्वी केली होती. त्यानुसार जमीर बागवान यांनी गेल्या २२ वर्षापासून दररोज न चुकता येथील जखमी प्राण्यांना केळी, सफरचंद, द्राक्ष व इतर फळे विनाशुल्क पुरवली आहेत. त्यांचं हे सामाजिक कार्य गेल्या २२ वर्षापासून अविरत अखंडपणे चालू असून ते पुढे देखील चालू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, सर्पराज्ञी वन्यजीव प्रकल्पाचे संचालक सिध्दार्थ सोनवणे यांनी जमीर बागवान यांच्या या उपक्रमाचा मोठा आधार मिळत असल्याचे सांगितले. फळांवर दररोजचा खर्च ३०० ते ४०० रुपये सर्पराज्ञी प्रकल्पामध्ये सातत्याने जखमी वन्यजीवांना उपचार करण्यासाठी आणले जात असून येथील जखमी प्राण्यांची संख्या मोठी असते. जमीर बागवान यांना या जखमी वन्यजीवांना अन्न पुरवताना सद्या दररोज किमान ३०० ते ४०० रुपये एवढा खर्च होतो. २२ वर्षांपासून बागवान हा खर्च करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.