आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराई:विनयभंगप्रकरणी फरार हनुमान महाराजास अटक, औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळला जामीन

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाललैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झालेले गेवराई तालुक्यातील कोळगाव सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांना गुरुवारी सकाळी गेवराई पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने अटक केली. महाराजांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुरुवातीला बीडच्या सत्र न्यायालयानेही फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. परंतु येथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

चकलांबा पोलिस ठाण्यात हनुमान महाराज गिरी यांच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार अप्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गिरी महाराजांनी आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. माझ्या मृत्यूला गावातील काही राजकीय व्यक्ती, पत्रकार, पीडित कुटुंबे जबाबदार असून अवघ्या पाच मिनिटांत मी गळफास लावणार असल्याचे महाराजांनी व्हिडिओत म्हटले होते. फरार झाल्यानंतर सलग तीन दिवस पोलिस महाराजांचा शोध घेत होते. दरम्यान, त्यांच्या नातेवाइकांनी ते जिवंत असल्याची पुष्टी दिली होती.

अज्ञात स्थळावरून अटक
२ दिवसांनंतर एका अज्ञात स्थळावरून हनुमान महाराज गिरी यांना गेवराईचे उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांच्या सूचनेवरून चंकलाबा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना गेवराई कोर्टापुढे हजर केले जाईल

बातम्या आणखी आहेत...