आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डेमय रस्त्यांच्या‎ त्रासातून नागरिकांची‎ मुक्तता होणार‎:अंबाजोगाई शहरातील 11 रस्त्यांसाठी 95 कोटी रुपयांचा निधी मंजूर‎

अंबाजोगाई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरोत्थान योजनेंतर्गत अंबाजोगाई‎ शहरातील ११ रस्त्यांसाठी तब्बल‎ ९५ कोटी रुपयांच्या निधीस‎ सोमवारी मंजुरी मिळाली आहे.‎ त्यामुळे लवकरच अंबाजोगाई‎ शहरातील बहुतांशी रस्ते सिमेंट‎ काँक्रीटचे होणार असून‎ नागरिकांची खड्डेमय रस्त्यांच्या‎ त्रासातून मुक्तता होणार आहे.‎ अंबाजोगाई शहरातील रस्त्यांसाठी‎ प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात‎ निधी उपलब्ध झाला आहे.‎ शांत आणि सुसंस्कृत,‎ शैक्षणिक वातावरणामुळे‎ अंबाजोगाईत राहण्यासाठी‎ आजूबाजूच्या गावातील लोक‎ प्राधान्य देतात. त्यामुळे नवनवीन‎ वसाहती तयार होत असून शहर‎ वेगाने वाढत आहे, त्यासोबतच‎ लोकसंख्याही वाढत आहे.

वाढत्या‎ शहरीकरणाची गरज लक्षात घेऊन‎ आमदार नमिता मुंदडा यांनी‎ शहरासाठीच्या विकासकामांकडे‎ विशेष लक्ष दिले आहे. रस्त्यांची‎ वारंवार होणारी दुरावस्था लक्षात‎ घेऊन शहरात सिमेंट काँक्रीटचे‎ पक्के रस्ते उपलब्ध करून‎ देण्यासाठी त्यांनी शासनाकडे‎ पाठपुरावा सुरू ठेवला होता.

अखेर‎ आ. मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश‎ आले असून अंबाजोगाई शहरात‎ सिमेंट काँक्रीटचे ११ रस्ते तयार‎ करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून‎ तब्बल ९४ कोटी ७८ लाखांचा‎ निधीस शासनाने सोमवारी मंजुरी‎ दिली. हे सर्व रस्ते सार्वजनिक‎ बांधकाम विभागामार्फत करण्यात‎ येणार असून लवकरच या‎ कामाच्या निविदा निघणार आहेत.‎ त्यामुळे लवकरच‎ अंबाजोगाईकरांची खड्डेमय‎ रस्त्यांच्या त्रासातून मुक्तता होणार‎ आहे. अंबाजोगाईच्या‎ विकासासाठी मोठा निधी उपलब्ध‎ करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री‎ एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय‎ सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री‎ अतुल सावे, खासदार प्रीतम मुंडे‎ यांचे आ. नमिता मुंदडा यांनी‎ विशेष आभार मानले आहेत. या‎ सर्व वरिष्ठ नेत्यांनी आ. नमिता‎ मुंदडा यांच्या कार्यकुशलतेवर‎ विश्वास ठेवत त्यांना मुक्तहस्ते ‎सहकार्य करून पाठीशी असल्याचे ‎ ‎ दाखवून दिले आहे. दरम्यान, रस्ते ‎ ‎ सिमेंट काँक्रीटचे झाल्यानंतर ‎ ‎ नागरिकांची खड्डेमय रस्त्यांच्या ‎त्रासातून मुक्तता होणार आहे.‎

ही तर फक्त सुरुवात‎
दिवंगत विमल मुंदडा यांच्या पश्चात त्यांच्या पावलावर पाऊल‎ ठेवून अंबाजोगाई शहराची विकासात्मक वाटचाल सुरू ठेवण्यास‎ ‎ माझे प्राधान्य आहे. शहरातील रस्ते‎ ‎ विकासासाठी ९५ कोटींचा निधी मिळणे हा तर‎ ‎ पहिला टप्पा आहे. शहराच्या सर्वांगीण‎ ‎ विकासासाठी भविष्यात आणखी निधी‎ ‎ आणण्याचे प्रयत्न सुरू राहतील. त्यासोबतच‎ ‎ ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी देखील‎ सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच त्यासाठी निधी‎ मिळण्याची आशा आहे.‎ - नमिता मुंदडा, आमदार, केज विधानसभा मतदारसंघ‎

बातम्या आणखी आहेत...