आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरुवातीला युती सरकार, नंतर महाविकास आघाडी सरकार अशा दोन सरकारांच्या काळात परळीतील बसस्थानक विकासासाठी दोन वेळा निधी मंजूर झाला. एकदा तर भूमिपूजनही झाले. परंतु प्रत्यक्ष बसस्थानकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या दुर्दशेमुळे पाच वर्षांपूर्वी बसस्थानकातील उपाहारगृहासह हिरकणी कक्ष, पार्सल कक्ष बंद तर पिण्याच्या पाण्याची टाकी नादुरुस्त आहे. बसस्थानकात सध्या दोन-दोन फुटांचे खड्डे पडले असून अवस्था बकाल झाली आहे. मागील ४६ वर्षांत परळीच्या लोकप्रतिनिधींना राज्य सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळाले, परंतु परळीच्या बसस्थानकाचा विकास झालेला नाही. स्थानिक सत्तेतील नेते निधी मंजूर करून अाणतात, पण सत्ता गेली की पुन्हा परिस्थिती जैसे थे हाेते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीत वैद्यनाथ मंदिर, त्याचबरोबर मराठवाड्यातील एकमेव असलेले औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, सिमेंट उत्पादन कंपनी, रेल्वेस्टेशन असल्याने देशभरातून प्रवासी येत असतात. बसस्थानकाची इमारत मोडकळीस आल्याने मागील पाच वर्षांपासून बसस्थानकातील उपाहारगृह, पार्सल कार्यालय, हिरकणी कक्ष, पाण्याची टाकी बंद आहे. खड्डे पडल्यामुळे बसगाड्या बसस्थानकात येण्यास व स्थानकातून बाहेर काढण्यासाठी अडथळे येतात. आगारात सध्या एकूण ६६ बस असून १३७ चालक व १५७ वाहक आहेत. सरकारकडून निधी मिळत नसल्याने बसेसची अवस्थाही खिळखिळी झाली आहे.
तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते १९ सप्टेंबर २०१९ रोजी भूमिपूजन झाले. त्यानंतर राज्यात सरकार बदलल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडे यांनी पूर्वीचा आराखडा रद्द करून नवीन व्यावसायिक आराखडा मंजूर केला.
नवीन रचनाकार नेमला परळी येथील बसस्थानकासाठी २०२१ मध्ये राज्य सरकारकडून दहा कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. तत्कालीन पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी या बसस्थानकासाठी काही नवीन योजना सांगीतल्या होत्या. त्यानुसार रचनाकाराने नवीन प्लॅन तयार केल्यांनतर सरकार बदलेले आता पुन्हा बसस्थानाकाच्या प्लॅनसाठी नवीन रचनाकार नेमला आहे. -अजय मोरे, विभाग नियंत्रक, बीड
सोयीसाठी आता मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती सुरू परळी बसस्थानकाचे मंजूर आराखड्यातुन अद्याप काम सुरू झालेले नाही. बसस्थानकात जागोजागी खड्डे पडले असल्याने बसेसचे नुकसान होण्याबरोबरच प्रवाशांना त्रास होत होता.आमच्या पातळीवर सध्या मुरूम टाकुन हे खड्डे तात्पुरते बुजवले आहेत. - प्रवीण भोंडवे, आगारप्रमुख, परळी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.