आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत अनेक नव्या रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे तसेच तालुक्यातील रस्त्याच्या डांबरीकरणाचा अनुशेष लवकरात लवकर भरून निघणार आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे मा.जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. श्री.खांडे हे राज्य महामार्ग ते नागापुर खु. या रस्त्याच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.
गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर म्हणजे शनिवार (दि.२) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागापुर मध्ये ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याच्या कामाचा करण्यात आला. या प्रसंगी या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक जयसिंग चुंगडे,तालूकाप्रमुख गोरख सिंघन, सरपंच मसुराम साळुंके, चेअरमन विष्णू साळुंके, अर्जुन साळुंके, अनंत साळुंके,राहुल साळुंके, विठ्ठल साळुंके, महेश साळुंके, जालिंदर साळुंके, दत्ता साळुंके, नारायण साळुंके,अजय साळुंके,मन्नू तात्या, खाजाभाई पठाण यांची उपस्थिती होती.
खांडे म्हणाले की, राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी (प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर होऊ न शकणार्या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी ) व सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. राज्य मार्ग ते नागपुर खु. हे ८० लाख रु.चे असून या कामाचा शुभारंभ होत असताना आपणास आनंद होत आहे. आपल्या भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायमच पुढाकार घेतलेला आहे.
आज या ठिकाणी होत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागपुर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आणि वाहन धारकांना मोठा फायदा होणार आहे. या भागातील वाहन धारकांची प्रलंबित मागणी या निमित्ताने पूर्ण होणार आहे.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मंजुर करून घेण्यात आपल्याला यश आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.