आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्पण‎:गजानन कारखान्याची पहिली‎ साखर गजाननचरणी अर्पण‎

बीड‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील गजानन सहकारी‎ साखर कारखान्याच्या गळीत‎ हंगामात निघालेली पहिली साखर‎ नवगण राजुरी येथील गणपतीच्या‎ चरणी आमदार संदीप क्षीरसागर‎ यांनी अर्पण करत मनोभावे दर्शन‎ घेतले.‎ नवगण राजुरी येथील सहकारी‎ साखर कारखाना मागील दहा‎ वर्षानंतर यंदा सुरू झाला असुन बीड‎ मतदारसंघातील उस उत्पादक‎ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत‎ झाल्या आहेत. सध्या या‎ कारखान्याचे प्रत्यक्ष उस गाळप सुरू‎ झाले आहे.

या कारखान्याच्या‎ पहिल्या चेअरमन दिवंगत लोक‎ नेत्या केशरकाकू क्षीरसागर या‎ कारखान्याच्या गाळपाची पहिली‎ साखर राजुरी येथील ग्रामदैवत‎ असलेल्या गणपतीच्या चरणी अर्पण‎ करत असत. अगदी हीच परंपरा‎ काकुंचे नातू आमदार संदीप‎ क्षीरसागर यांनी कायम ठेवली आहे.‎ नवगण राजुरी येथील साखर‎ कारखान्यात तयार झालेली पहिली‎ साखर ग्रामस्थांच्या उपस्थितीत‎ गणपतीसमोर ठेवुन दर्शन घेण्यात‎ आले. यावेळी कारखान्याचे‎ कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...