आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानन सहकारी सुत गिरणीने मारली बाजी:माजीमंत्री क्षीरसागर यांच्या सुत गिरणीचा राज्यात प्रथम क्रमांक; महाराष्ट्र फेडरेशनच्या अहवालात समावेश

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सहकारी सुत गिरणीच्या एकूण यादीत तांत्रिक, आर्थिक आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर अध्यक्ष असलेल्या गजानन सहकारी सूत गिरणीचा प्रथम क्रमांक आला असून महाराष्ट्र फेडरेशनच्या अहवालात या सूत गिरणीचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सूतगिरणी फेडरेशन मुंबईच्या यादीत 2020-21 वर्षात तांत्रिक आणि आर्थिक कामगिरीसाठी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर अध्यक्ष असलेल्या बीडच्या गजानन सहकारी सुत गिरणीचा प्रथम क्रमांक असून उत्कृष्ट नियोजन करून तांत्रिक आणि आर्थिक बाबतीत सुत गिरणीचे व्यवस्थापन नावाजले गेले आहे, गेल्या दोन वर्षात गजानन सुत गिरणीमध्ये कठीण परिस्थिती निर्माण झाली होती, कोरोना संकट, शॉर्ट सर्किट, बाजार पेठची उपलब्धता यातून मार्गक्रमण करत दर्जेदार उत्पादन सुरूच ठेवले.

लॉकडाऊनच्या काळातही शासनाच्या नियमानुसार सुत गिरणीचे काम चालूच होते, त्यामुळे या सुत गिरणीला 7 कोटी 82 लाखाचा रोखीचा नफा मिळाला. तर 3 कोटी 66 लाख निव्वळ नफा प्राप्त झाला. राज्यातील पहिल्या 5 सुत गिरणीच्या एकूण व्यवस्थापनात गजानन सहकारी सुत गिरणी तिन्ही बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे.

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक विश्वनाथ काळे यांच्या नियोजनात या सुत गिरणीने आपली कामगिरी उत्तम करून दाखवली आहे, हे सारे यश सर्वांच्या सहकार्याने मिळाले असून सुत गिरणीने परदेशात सुत निर्यात करून आपला दर्जा कायम राखला आहे असे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...