आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज जप्त:जुगार अड्ड्यावर छापा, २८ जणांवर गुन्हा

परळी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने भोपळा शिवारात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

परळी-अंबाजोगाई रोडच्या उत्तर बाजूस भोपळा शिवारात एका हॉटेलशेजारील पत्र्याच्या रूममध्ये काही व्यक्ती जुगार खेळत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून सहायक पोलिस अधीक्षक कुमावतांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला. जुगार खेळणाऱ्यास ताब्यात घेत त्यांच्याकडून मोबाइल, जुगार साहित्य, गाड्यांच्या किमतीसह नगदी रक्कम ३ लाख ७६ हजार रुपये जप्त केले. या कारवाईत हॉटेलचे चालक-मालक, वेटर, कुक व बघे यांना आरोपी बनवले. ही कारवाई करताना बघ्यांनी गर्दी केली होती. एकूणच हॉटेलमधील ग्राहक व कामगारांना आरोपी केले. सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाणे परळी येथे गुन्हा नोंदवला. २८ आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद केला.

बातम्या आणखी आहेत...