आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत गुन्हा नोंद:दहा लाखांचे कर्ज देतो म्हणत 1 लाखाचा गंडा

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा लाखांचे कर्ज देतो म्हणत एका अॅपच्या साहाय्याने नोकरदाराला १ लाख ७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार बीड शहरात समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

सचिन भागवत गायकवाड (३७, रा. धानोरा रोड, बीड) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २ मे रोजी त्यांना धनी अॅपच्या माध्यमातून दहा लाखांचेे कर्ज मिळत असल्याबाबत संदेश आला होता. त्यांनी अॅपच्या माध्यमातून कर्ज मिळण्यासाठी कागदपत्रे अपलोड केली. दरम्यान, प्रोसेसिंग फीस व इतर कारणांसाठीचे चार्जेस १ लाख ७ हजार ५०४ रुपये फोन पेवर टाकण्यास सांगण्यात आले. त्यानुसार गायकवाड यांनी दोन मोबाइल क्रमांकावरील खात्यांवर १ लाख ७ हजार ५०४ रुपये ट्रान्सफर केले. मात्र, फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपास पोलिस निरीक्षक केतन राठोड हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...