आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीड:रस्त्याच्या मागणीसाठी चिखलात गाडून घेत आंदोलन, पाटोदा तालुक्यातील गितेवाडीच्या युवकांची गांधीगिरी

पाटोदा (बीड)22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गितेवाडी येथील रस्त्याची दुरवस्था होऊन अनेक वर्षे लोटली. मात्र, त्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देईनात अन् प्रशासनही पाहीना. ग्रामस्थांनी निवेदने, मागण्या करून झाल्या. अखेर वैतागलेल्या युवकांनी सामाजिक कार्यकर्ते चांगदेव गिते यांच्या नेतृत्वाखाली चक्क चिखलात गाडून घेत बुधवारी आंदोलन केले.

दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर मुरूम आणून टाकण्यात आला. मात्र, हा रस्ता पक्का व दर्जेदार करावा, अशी मागणी युवकांनी लावून धरली आहे.