आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:गणेश मंडळांनी अन्न प्रशासनाकडे नोंदणी करावी

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश मंडळांनी प्रसाद वाटप करताना काळजी घ्यावी यासाठी अन्न प्रशासनाकडे ऑनलाइन नोंदणीचे आवाहन अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त इम्रान हाश्मी यांनी केले.

अन्नदान प्रसाद वाटप करणाऱ्या गणेश मंडळांनी ऑनलाइनरीत्या अन्न नोंदणी करून घ्यावी हे नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ ऑनलाइन देण्यात येईल. प्रसादामध्ये दूध किंवा खव्याचा वापर शक्यतो टाळावा. दूध किंवा खव्याचे पदार्थ दोन तासांपेक्षा जास्तवेळ तापमानाला ठेवू नये. तसेच फळांचा वापर १ दिवसाच्या आत करावा. अन्न पदार्थ स्वच्छ जागी सावलीत झाकून ठेवावेत. अन्न पदार्थ तयार करणाऱ्या व वाटप करणाऱ्या भक्तांची वैद्यकीय तपासणी करावी, आजारी असलेल्या भक्तांनी प्रसाद तयार करणे व वाटप करणे टाळावे.

वैयक्तिक स्वच्छता पाळावी, प्रसाद तयार करण्याची जागा व पिण्याचे पाणी स्वच्छ असावे. शुद्ध असावे, हात व भांड्याचा वापर करण्यापूर्वी ते स्वच्छ धुवूनच त्याचा वापर करावा. व्यावसायिकांनी मिठाईच्या टेबलवर दर्शनी भागात अन्न पदार्थ किती तारखेपर्यंत वापर करावाचा, याची माहिती द्यावी. दुग्धजन्य पदार्थाची मिठाई ८ ते १० तासांत खाण्याबाबत पॅकेटवर निर्देश द्यावे, असे हाश्मी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...