आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडकरांचा आगळा-वेगळा देखावा:सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या 100 फूट लांब गुहेतून माँ वैष्णोदेवी प्रतीकृतीचे दर्शन; उद्या जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन

रवी उबाळे | बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरामध्ये मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या गणेश उत्सवामध्ये सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फूट लांब गुफेतून माँ वैष्णो देवी प्रतीकृतीचे दर्शनाचा देखावा साकारला आहे. या देखाव्याचे उद‌्घाटन सोमवारी (दि. 5) रात्री आठ वाजता जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते होणार आहे.

मंडळाचे मार्गदर्शक गिरीष गिलडा सांगितले की, सोमवारी (दि.5) रात्री आठ वाजता शनी मंदिर गल्ली, विठ्ठल मंदिर चौक पेठ बीड येथे देखाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पेठ बीड कृती समितीचे अध्यक्ष अमृत काका सारडा, राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम धूत यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बीड शहरामध्ये बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळाची स्थापना 1954 मध्ये झालेली आहे. सध्या मंडळाचे हे 68 वे वर्ष आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक सामजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहे.

दर्शनासाठी रांगा

दरवर्षी गणेश उत्सव थाटामध्ये साजरा करण्याची मंडळाची परंपरा आहे. यंदाच्या वर्षी मंडळाने बीडकरांसाठी सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फूट लांब गुफेतून माँ वैष्णोदेवी प्रतीकृतीचे दर्शन देखावा साकारला आहे. दोन वर्षापूर्वी बर्फाणी बाबा अमरनाथ दर्शन देखावा पाहण्यासाठी महिला–पुरुषांच्या रांगा होत्या. मंडळाने हा देखावा भाविकांसाठी मोफत ठेवला होता.

भाविकांना लाभ घ्यावा

बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळाचा काेराेनानंतर बीडकरांसाठी आगळ- वेगळा देखावा पाहण्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळ अध्यक्ष बबलू गिलडा, कार्याध्यक्ष विशाल शर्मा, उपाध्यक्ष व्यंकटेश दोडे, सचिव सतीश पगारिया, कोषाध्यक्ष कृष्णा मुंदडा, सह नरेश मुंदडा, प्रगेश‌ कुलकर्णी, अभिजीत दोडे, फामजी पारिख, पुष्कर मुंदडा, गोविंद शर्मा, गोपाल शर्मा, मयुर गिलडा, ऋषिकेश मुंदडा, श्रेयस गिलडा, राम पारिख, शाम पारिख, गोविंद शर्मा, गणेश लोंढे यांनी केले आहे.

भाविकांचा सकारात्मक प्रतिसाद

बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्विकारलेली सामाजिक जबाबदारी आणि भाविकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हेच मंडळाचे यश आहे. यातूनच मंडळ पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवले जातात. - गिरीष गिलडा, मार्गदर्शक, बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळ

बातम्या आणखी आहेत...