आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाही:गंगामाउली शेतकऱ्यांचे हित जोपासणार

केज14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विखे पाटील साखर कारखाना हा आता गंगामाऊली शुगर ॲड अलाईड इंडस्ट्रीजने चालविण्यास घेतला असून येणाऱ्या हंगामात गंगामाऊली या नावाने साखर कारखाना सुरू होत आहे. हा कारखाना शेतकरी बांधवांना सोबत घेऊन चालणार असून शेतकऱ्यांचे हित जोपासणार आहे, अशी ग्वाही गंगामाऊली शुगर इंडस्ट्रीजचे मुख्य शेतकी अधिकारी अविनाश आदनाक यांनी केले.

केज तालुक्यातील तांबवा येथे ऊस विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य शेतकी अधिकारी अविनाश आदनाक हे बोलत होते. पुढे बोलताना आदनाक म्हणाले की, ऊस गाळपात कारखाना कुठल्याही प्रकारचे राजकारण करणार नसून कुठल्याही शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही. त्यामुळे कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून घ्यावी. असे आवाहन करीत त्यांनी कारखान्याच्या नियोजन पध्दतीसह १०००१ या जातीच्या ऊस लागवडी संबंधी सविस्तर माहिती दिली.

यावेळी गंगामाऊली शुगरचे ऊस पुरवठा अधिकारी हिरे, ऊस विकास अधिकारी सावंत यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शेतकी विभागाचे भिसे, कृषी सहाय्यक आशिष सोनवणे, सरपंच सदाशिव चाटे, दिलीप चाटे, दिपक कराड यांच्यासह गाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...