आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती सजावट:गौरी गणपती सजावट स्पर्धेतून महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला : डॉ. सारिका क्षीरसागर

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौरी गणपतीच्या आकर्षक व सामाजिक सांस्कृतिक परंपरेचे दर्शन, ग्रामीण जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या सजावटी सर्वत्र पाहायला मिळाल्या. या माध्यमातून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यामध्ये कल्पतरू गौरी सजावट स्पर्धा ही यशस्वी झाली, असे प्रतिपादन डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केले.

बीड येथे कल्पतरू व्यासपीठाच्या माध्यमातून गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपापल्या निवासस्थानी आकर्षक सजावट केली. डॉ.सारिका क्षीरसागर यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन सजावटींची पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान या स्पर्धेंतर्गत रुपाली चरखा व विवेक चरखा यांनी देवीचे साडेतीन शक्तीपीठ हुबेहुब त्यांनी साकारले होते.

याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. क्षीरसागर म्हणाल्या की, मला अभिमान वाटतोय की या माध्यमातून आम्ही महिलांच्या सुप्त गुणांना बाहेर काढुन त्यांचा सन्मान करु शकलो. हे शक्य झाले ते या स्पर्धेमुळे. दरवर्षी सजावट तर होतेच परंतु यावेळेस स्पर्धेमुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. खुप ठिकाणी प्रेमाने, आपुलकीने महिला-भगिनिंनी आदरातिथ्य केले हे माझ्यासाठी कौटुंबिक स्नेह वाढवणारे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यासमयी विविध गणेश मंडळांना देखील भेटी देऊन श्रींचे दर्शन घेतले. याप्रसंगी महिला-भगिनी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...