आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:गौतम बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी अंतर्मनाची सेल्फी शिकवली

अंबाजोगाई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुमारे २५०० वर्षापूर्वीच आपल्या अंतरमनाची सेल्फी काढण्याची शिकवण संपूर्ण जगाला दिली असे प्रतिपादन विद्रोही शाहिर शीतल साठे यांनी केले.अंबाजोगाई येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने तसेच विद्रोही नवयान महाजलसा या समाजप्रबोधन पर कार्यक्रमात बोलत होत्या .यावेळी त्यांच्या सोबत विद्रोही कवी सचिन माळी हे देखील उपस्थित होते.

व्यासपीठावर अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे , बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी , पणन महासंघाचे अॅड विष्णुपंत सोळंके, संचालक प्रा. वसंत चव्हाण, पुषोत्तम चोकडा, दिनकर जोशी, मनोज लखेरा, महादेव आदमाने, कचरू सारडा, गणेश मसने, सुनील वाघळकर, धम्मा सरवदे , संतोष शिनगारे , सुनील व्यवहारे आदींची उपस्थिती होती. प्रास्तविक अॅड विष्णुपंत सोळंके यांनी केले .राजकिशोर मोदी म्हणाले, अंबाजोगाई शहर हे चळवळीचे शहर आहे. देशातील महामानवांनी देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुभाव देण्याचे काम केले. त्यांचाच वसा सचिन माळी व शितल साठे या चालवत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

शितल साठे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर देखील त्यांनी प्रकाश टाकला.ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचले. संत गाडगेबाबा यांनी माणसाच्या मनातील घाण दूर करण्याचे काम केले. या नवयान महाजलस्यात हजारो नागरीकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाचे संचलन महादेव आदमाने, विजय रापतवार, तसेच अनंत कांबळे यांनी केले.

शीतल साठे यांनी वामनदादा कर्डक यांचा पाण्यासाठीचा संघर्षमय पोवाडा “पाणी वाड गं माय, पाणी वाड गं माय” सादर केला. महाडच्या तळ्याचं पाणी पेटलं गं बाई, त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल गं बाई” हा पोवाडाही सादर केला.कार्यक्रमाची सांगता संविधान वाचन करून झाली.

बातम्या आणखी आहेत...