आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबा प्रदर्शन:केजमध्ये मंगळवारी गावरान आंब्यांचे प्रदर्शन ; गावरान आंब्यांच्या प्रजातीला पारितोषिक दिले जाणार

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण दिनाच्या औचित्यावर केज येथील बसस्थानकासमोर मंगळवारी (७ जून) तालुकास्तरीय भव्य गावरान आंब्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. केज रोटरी क्लबने हा उपक्रम मागील वर्षीपासून हाती घेतला आहे. या प्रदर्शनात भाग घेऊ इच्छिणाऱ्या आंबे उत्पादक शेतकऱ्यांनी ७ जून रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत आंबे घेऊन प्रदर्शनात सहभागी व्हावे. पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट गावरान आंब्यांच्या प्रजातीला पारितोषिक दिले जाणार आहे. तालुक्यातील गावरान आंबे उत्पादक, नागरिकांनी या प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष बापूराव सिंगण, अरुण अंजान, संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले, प्रोजेक्ट चेअरमन श्रीराम शेटे, श्रीराम देशमुख, श्रीमंत यादव यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...