आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागात गावोगावी असणाऱ्या गावरान आंब्याच्या सर्वोत्कृष्ट प्रजाती जपल्या जाव्यात, याकरिता केज रोटरीच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या केज तालुका गावरान आंब्याच्या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शनात सतीश बजरंग नेहरकर, सोजर रामकिशन तपसे, चंद्रकला नेहरकर, रघुनाथ विठोबा आगे, महादेव अश्रूबा धपाटे, आशाबाई रघुनाथ आगे, भागवत रतन धपाटे, शारदा वसंतराव गुंड, डॉ. उमाकांत मुंडे, अॅड. अनिता मुंडे, वृंदावणी खाडे, अंकुश धर्मराज गायकवाड, रामेश्वर मारोती घुले, सुनंदा दिनकर घुले, अक्षय वाघमारे व सुचिता रमाकांत डिकले यांनी भाग घेतला.
या आंब्यांचे परीक्षण आंब्याची चव, गोडी व आकार याआधारे केले गेले. यामध्ये डाेणगाव येथील सुनंदा दिनकर घुले यांच्या गावरान आंब्याला प्रथम क्रमांक मिळाला. सुर्डी येथील शिवाजी हरिभाऊ ईखे यांच्या आंब्याला दुसरा, तर शारदा वसंतराव गुंड यांच्या आंब्याने तिसरा क्रमांक मिळवला. भागवत रतन धपाटे व अॅड. अनिता मुंडे यांच्या गावरान आंब्यांना प्रोत्साहन बक्षिसे दिली गेली. पारितोषिके मिळवलेल्या आंब्याच्या कोया प्राप्त करून त्यांची रोपे तयार करून लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रदर्शनात संकरित प्रकारच्या केशरसह इतर कोणत्याही आंबा जातीला स्थान दिले नव्हते.
या प्रदर्शनामुळे गावरान आंब्यांच्या विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात झाली. आंब्याचे परीक्षण विकास मिरगणे, दादा जमाले, प्रा. डॉ. बी. जे. हिरवे, भीमराव लोखंडे, अरुण नगरे यांनी केले. या प्रदर्शनाला रोटरीच्या माजी अध्यक्षा व नगराध्यक्षा सीता बनसोड, हारून इनामदार यांच्यासह अनेक नागरिकांनी भेट देऊन रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी रोटरीचे अध्यक्ष बापूराव सिंगण, सचिव अरुण अंजान, प्रोजेक्ट चेअरमन श्रीराम शेटे, श्रीराम देशमुख, हनुमंत भोसले, प्रवीण देशपांडे, महेश जाजू, पशुपतिनाथ दांगट, विकास मिरगणे, प्रवीण देशपांडे, डॉ. संतोष जोशी, महेश जाजू, विजय जॅकेटिया, डी. एस. साखरे, दत्ता हंडीबाग, धनराज पुरी, प्रकाश कामाजी, अनंत तरकसबंद, डॉ. दिनकर राऊत, राहुल सोनवणे, सूचित शेटे, सत्यवान राऊत, संतोष पिलाजी, हनुमंत बोर्डे, अरूण नगरे, बापूराव वाळके, संजय डांगे, श्रीमंत यादव, प्रा. डॉ. सी. एन. सोळंके यांनी विशेष परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.