आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:पोल्ट्रीफार्मच्या शेडमधून गावरान कोंबड्या चोरीस

गेवराई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वडगाव ढोक फाट्याजवळील युवराज पोल्ट्रीफॉर्म मधील एका सेडमधुन २४४ गावरान कोंबड्या चोरीला गेल्याची घटना सोमवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून चोरी गेलेल्या कोंबड्याची किंमत ७६ हजार १२८ रूपये आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गेवराई शहरातील भगवान नगर येथील रहिवासी असलेले संतोष आंधळे यांनी राष्ट्रीय महामार्ग वरील शिवारात गट नं २०० येथे त्यांचे सासरे पंढरीनाथ बारगजे यांचे बाराभाई या शेतात २०२० मध्ये युवराज पोल्ट्रीफार्म उभे सुरू केलेले असून दोन शेडमध्ये पाच हजार कोंबड्याची पिल्ले आणून व्यवसाय सुरु केला. दरम्यान रविवार २० नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चोरांनी यतील एका शेडमधील लाल, काळ्या, तपकिरी, पांढऱ्या रंगाच्या २४४ गावरान कोंबड्या चोरून नेल्याची सोमवारी उघडकीस आली आहे.

बातम्या आणखी आहेत...