आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभगवद्गीता हा भारतीय संस्कृतीतील सर्वात श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाचे पारायण, वाचन घराघरात व्हावे. मुलांना भारतीय संस्कृतीचे ज्ञान व्हावे या दृष्टीने हा संस्कार विद्यार्थ्यांवर करण्याचे काम सर्वांचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुहास मोराळे यांनी केले.
बीड येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात अभ्यासपूरक मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण लोहिया हे होते तर प्रकाश दुगड, कार्यवाह विष्णुपंत कुलकर्णी, प्रशांत भानप, अभय कोकड, उपप्राचार्य डॉ.गजानन होन्ना, डॉ.युवराज मुळ्ये, प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर, यांची प्रमुख उपस्थित होती. प्राचार्य डॉ. सुहास मोराळे यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व संस्कार केंद्रामध्ये भगवद्गीता पठणाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या एक चांगला संस्कार व्हावा म्हणून वर्षभर केला जाणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या सर्व संस्कार केंद्रामध्ये गीता जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा.समीर मुळी यांनी केले तर आभार प्रा. प्रतिभा जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थ िनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.