आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोगत:लेखक जॉर्ज ऑर्वेल यांचे लिखाण आजही समकालीन ; अमृत महाजन यांचे प्रतिपादन

अंबाजोगाई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक जॉर्ज ऑर्वेल म्हणजे विविधांगी व्यक्तिमत्व होते. त्यांनी अनेक विषयावर मोठ्या प्रमाणात लिखाण केले. त्यांचे लिखाण आजही समकालीन ठरते, असे प्रतिपादन अमृत महाजन यांनी केले.योगेश्वरी शिक्षण संस्था व कर्मचारी गणेश व्याख्यानमालेत बुधवारी (ता.७ सप्टेंबर) महाजन यांचे व्याख्यान पार पडले. त्यांनी ‘जॉर्ज ऑर्वेल साहित्यकृतीची प्रासंगिकता’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सहसचिव एस.के.बेळूर्गीकर होते. ऑर्वेल यांच्या कादंबरीच्या लेखनातील स्वातंत्र्य आणि लोकशाही या अनुषंगाने रूपक कथेच्या माध्यमातून प्राण्यांची कथा सांगून महाजन यांनी लोकशाही व स्वातंत्र्य याचा परामर्श घेतला. प्राण्यांचे स्थापन झालेले राज्य आणि माणसाचे हरवले पण याचे अगदी सूक्ष्म पद्धतीने त्यांनी विश्लेषण केले आणि माणूस संज्ञेचे प्राण्यांमध्ये पसरलेले वैमनस्य त्यांनी संशोधक पद्धतीने श्रोत्यांसमोर मांडले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे, व्ही.के.चौसाळकर, शिवाजी कराड, प्रा.एम .एस.लोमटे, एन.के.गोळेगावकर, वाय.एच.राठोड यांच्यासह अन्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...