आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विधानसभेत सत्ताधाऱ्यांनीच प्रश्न उपस्थित केला होता. जिल्ह्यातील ६ पैकी ४ आमदार व विधान परिषदेचे विनायक मेटे अशा ५ आमदारांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनीही या चर्चेत भाग घेत आवाज उठवला होता. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसपी आर. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
दरम्यान, मंगळवारी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी बीडमध्ये भेट देत गुन्हे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी वार्षिक तपासणीवेळी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली का, याची माहिती जाणून घेतली. शिवाय, पोलिसांचे कामकाज अधिक गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी काही सुधारणा सूचवल्या होत्या, त्याचाही आढावा घेतला. ठाण्यात पाऊल ठेवणाऱ्यांचे समाधान झाले पाहिजे, ती पोलिसांची ड्युटी आहे, हे विसरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. ठाणे आपले आहे, असे समजून तेथील स्वच्छता व टापटीपसंदर्भात योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, रश्मिथा एन.राव, अंबाजोगाईच्या अपर अधीक्षक कविता नेरकर, गुन्हे शाखेचे पो.नि.सतीश वाघ आदी उपस्थित होते.
दोषसिद्धीचे सरासरी प्रमाण केवळ ८ टक्के
जिल्ह्यात २०२१ मध्ये दोषसिद्धीचे सरासरी प्रमाण केवळ ८ टक्के आहे. त्यापूर्वी दोषसिद्धीचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत गेले होते. यात झालेल्या घसरणीमुळे आयजी प्रसन्ना यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, दोषसिध्दी वाढविण्यासाठी अधिक कौशल्यपूर्ण व अभ्यासपूर्ण तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी २२ प्रकरणांचा प्रातिनिधिक स्वरुपात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली तपास सुरु आहे.
शहर ठाण्याला भेट, पोलिसांची त्रेधा
अचानक आयजी आल्याने ठाण्यातील कर्मचाऱ्यांची अक्षरश: धांदल उडाली. सहायक पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी आयजींचे स्वागत केले. प्रसन्ना यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सूचना दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.