आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुर्ववत:गेवराई-नारायणगड बस दोन वर्षांनंतर झाली सुरू

गेवराई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई ते श्रीक्षेत्र नारायणगड ही मुक्कामी एसटी बस कोरोना काळापासून बंद करण्यात आली होती. यामुळे नारायणगडावर जाणाऱ्या भाविकांसह पाडळसिंगी, मादळमोही, कोळगाव, तांदळा, फुलसांगवी, साक्षाळपिंप्री आदी परिसरातील नागरीकांना गैरसोईचा सामना करावा लागत होता. ही बस गेवराई आगारातून पुर्ववत सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून श्रीक्षेत्र नारायणगडाची ओळख आहे. दरम्यान या गडावर दर्शनासाठी दुरहून भाविक येत असतात. औरंगाबाद, जालनासह इतर जिल्ह्यातील भाविकांसाठी गडावर मुक्कामी जाण्यासाठी गेवराई आगारातून सायंकाळी जाणारी एसटी बस सोईस्कर होती. तसेच तसेच साक्षाळपिंप्री, फुलसांगवी, तांदळा, कोळगाव, सावरगाव, मादळमोही आदी परिसरातील नागरीकांना श्रीक्षेत्र नारायणगडावर मुक्कामी असलेली ही बस सकाळी गेवराई येथे जात असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने सोईस्कर होती. मात्र ही बस कोरोना काळात बंद करण्यात आली होती.

यामुळे गडावर येणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत होता. बस सुरु करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. बस पूर्ववत सुरु करण्यासाठी आ.लक्ष्मण पवार, मा.आ.बदामराव पंडित यांनी देखील आगार प्रमुखांना संपर्क केला होता. ही बस पुर्ववत सुरु करण्यात आली आहे. चालक बापुराव नलावडे व वाहक प्रकाश शेळके यांचे स्वागत करण्यात आले. बस गेवराईहून सायंकाळी ५ वाजता तर नारायणगड येथून सकाळी ६:४५ वाजता सुटेल.

बातम्या आणखी आहेत...