आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेशीम उत्पादनात गेवराई तालुका हा ३१८ कामे पूर्ण करून राज्यात भारी ठरला असून असून या कार्याबद्दल तहसीलदार सचिन खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रोहयो मंत्री संदीपान भुमरे ( यांच्यासह विविध खात्याचे मंत्री, मुख्यसचिव व अपर मुख्य सचिव यांची उपस्थिती होती.
मनरेगा आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करुन सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवणे आणि सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजनेच्या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात सातत्याने अग्रेसर भुमिका राखली असून यामध्ये मोठया प्रमाणात अकुशल कामे व कुशल कामांमध्ये मत्ता निर्माण केलेली आहे. कामांमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक कामांमध्ये अंगणवाडी बांधकाम, गायगोठा, शेळी मेंढी पालन शेड, कुक्कुटपालन शेड, शेततळे, गोदाम बांधकाम, सिंचन विहिरी, नाडेप, वर्मी कंपोस्ट बांधकामे, वनीकरण, (शेत बांधावरील), सामाजिक वनीकरण ( वनविभाग), शाळेला भिंत बांधकाम करणे, रेशम उत्पादन, शोषखड्डेची कामे आदी कामे. सन २०२० - २१ पासून मोठया प्रमाणात घेण्यात आले आहेत.
वरील सर्व कामे सार्वजनिक व वैयक्तीक स्वरूपाची असुन सुविधा संपन्न कुटूंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यंत अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी व रोजगार सेवकांपर्यंत आहे. ही कामे यशस्वी केल्याबद्दल राज्यातील ग्रामपंचायतस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या ६१ अधिकारी/कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.
यामध्ये, उत्कृष्ट कार्याबद्दल तहसीलदार सचिन खाडे, रेशम विकास अधिकारी विनीत पवार, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रशांत कोकुडे यांच्यासह आदींचा हा विशेष गौरव करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. रेशीम उत्पादन संपूर्ण राज्यात सन २०२० - २१ पासुन आतापर्यंत ७६३२ रेशीम उत्पादनाची कामे हाती घेण्यात आलेली असून त्यापैकी ९१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यांतर्गत गेवराई तालुक्यात सर्वात जास्त ३१८ कामे पूर्ण करून प्रगती पथावर असल्यामुळे गौरव करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.