आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक संघ:शिक्षक संघ पाटोदा तालुकाध्यक्षपदी घुमरे, तर सचिवपदी काळुशेंची निवड

पाटोदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षक संघाच्या पाटोदा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी दादासाहेब घुमरे तर तालुका सचिवपदी बाळासाहेब काळूशे यांची निवड करण्यात आली.

भामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभगत यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक डी.जी.तांदळे, संघटनेचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष शेवाळे, माजी मुख्याध्यापक एल.आर.जाधव, प्राचार्य तुकाराम तुपे यांच्या उपस्थितीत ही निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...