आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा:मुलीवर अत्याचार, आरोपीस अटक

दिंद्रूडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार माजलगाव तालुक्यात समोर आला. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला गेला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

दिंद्रुड पोलिस ठाणे हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला केज तालुक्यातील नागझरी येथील सचिन तोंडे या युवकाने फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून २१ जून रोजी दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी बीड येथून दोघांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब उघड झाल्यामुळे बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला. तपास पीएसआय निशिगंधा खुळे, कर्मचारी माया मस्के करत आहेत.