आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरिस्थिती कोणतीही असो मुली त्याला यशस्वीपणे सामोरे जातात. त्यामुळे मुलींचे यशस्वी होण्याचे प्रमाण आज अधिक आहे. याशिवाय मुली या प्रत्येक क्षेत्रात यशोशिखरावर पोचत आहेत, असे मत अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई येथील संगीता गिरीधारीलाल वैष्णव हिची इंडिगो एअरलाईन्समध्ये एअर होस्टेसपदी निवड झाली. या निवडीबद्दल तिचा सत्कार व सन्मान करतांना मोदी हे बोलत होते. मनोज लखेरा, महादेव आदमाने, धम्मा सरवदे, संतोष शिनगारे, सुनील वाघाळकर,सुनील व्यवहारे, दिनेश भराडीया, राणा चव्हाण, गोविंद पोतंगले, सचिन जाधव, बालाजी वैष्णव, अभिमन्यु वैष्णव यांच्यासह संगीताची आई व तिचे नातेवाईक उपस्थित होते. जिद्दीच्या व परिश्रमाच्या जोरावर आणि आई वडिलांच्या सहकार्याने संगीताने हे यश मिळवले आहे. मुली आज कुठलीही परिस्थिती असो त्याला समर्थपणे सामोरे जातात. आज कुठलेही क्षेत्र असो मुली कुठेच पाठीमागे नसल्याचे मोदी यांनी सांगितले. एखाद्या पराभवाने खचून न जाता त्याला सामोरे जाण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला. संगीताने अपार मेहनतीने आकाशात उंच भरारी घेतली त्याबद्दल तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महादेव आदमाने, गोविंद पोतंगले, मनोज लखेरा यांनीही संगीतास मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभाचे सूत्र संचलन शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी केले तर आभार सुनील व्यवहारे यांनी व्यक्त केले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नव्या क्षेत्रात पाऊल टाका, तिथेही यश मिळते
पारंपरिक पध्दतीने आपण सर्व ठरलेल्या वाटा धुंडाळतो. मात्र असे न करता आपल्या आवडीच्या क्षेत्रातही उतरले पाहिजे. असे केले तर आपले यश अधिक ठळकपणे दिसून येते. नव्या क्षेत्रात पाऊल टाका तिथे प्रामाणिकपणे मेहनत करा, यश हे ठरलेले आहे, असे मत याप्रसंगी संगीता वैष्णव यांनी व्यक्त केले. यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. संगीताचे यश हे तालुक्यातील युवक, युवतींना प्रेरणा देणारे आहे, असे मत मनोज लखेर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.