आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई:छेडछाडीचा जाब विचारल्याने मुलीच्या आईचा भोसकून खून, परळी तालुक्यात घटना; बापलेकास केली अटक

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीची का छेडछाड केली याचा जाब विचारल्याने मुलीची आई अनिता राठोड (३२) यांचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा गावात मंगळवारी नागपंचमीच्या दिवशी सकाळी घडली. या खूनप्रकरणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात राठाेड कुटुंबीयांसह नागरिकांनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर पोलिसांनी चार पथके कार्यरत करून बबन ऊर्फ नितीन चव्हाण (१९) व त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण (४०) या बापलेकांना अटक केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

अनिता राठोड व वैजनाथ राठोड हे कुटुंब आठ दिवसांपूर्वी तिरुपतीला दर्शनाला गेले होते, तर त्यांच्या तीन मुली काळवटी तांडा येथे होत्या. या तांड्यावरील बबन चव्हाणने अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिला त्रास दिला. आईवडील तिरुपतीहून परत आल्यानंतर मुलीने सर्व प्रकार दोघांना सांगितला. त्यानंतर जाब विचारल्यानंतर खून झाला.