आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:छेडछाड केल्याचा जाब विचारल्याने मुलीच्या आईचा भोसकून खून

अंबाजोगाई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीची का छेडछाड केली याचा जाब विचारल्याने मुलीची आई अनिता राठोड (३२) यांचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा गावात मंगळवारी नागपंचमीच्या दिवशी सकाळी घडली. या खूनप्रकरणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात राठाेड कुटुंबीयांसह नागरिकांनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर पोलिसांनी चार पथके कार्यरत करून बबन ऊर्फ नितीन चव्हाण (१९) व त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण (४०) या बापलेकांना अटक केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

वानटाकळी तांड्यावरील अनिता राठोड व वैजनाथ राठोड हे कुटुंब आठ दिवसांपूर्वी तिरुपतीला दर्शनाला गेले होते, तर त्यांच्या तीन मुली काळवटी तांडा येथे होत्या. या तांड्यावरील बबन चव्हाणने अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिला त्रास दिला. आईवडील तिरुपतीहून परत आल्यानंतर मुलीने सर्व प्रकार दोघांना सांगितला. त्यानंतर २ दिवसांपूर्वी राठोड दांपत्याने बबन चव्हाणला छेडछाडीवरून जाब विचारला. याच राग धरून मंगळवारी सकाळी ८ वाजता बबन चव्हाण व त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण, भाऊ सचिन चव्हाण या तिघांनी राठोड यांच्या घरी जाऊन भांडणे केली. या वेळी मुलीचे वडील वैजनाथ राठोड यांना मारहाण होऊ नये म्हणून नातेवाइकांनी दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवले.

बबन चव्हाणने चाकूने दुसऱ्या खोलीत असलेल्या अनिता राठोड यांच्या पोटात वार करत डोक्यात लाकडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या अनिता चव्हाण यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी वानटाकळी येथे घटनास्थळी जाऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.

अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात ठिय्या
आरोपींच्या अटकेसाठी मृताच्या कुटुंबीयांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. यानंतर राजेभाऊ चव्हाण व बबन चव्हाण यांना पोलिस निरीक्षक श्रीनिवास सावंत, विठ्ठल केंद्रे, बापू राऊत, नारायण गायकवाड, महेश भागवत, कल्याण देशमाने, प्रवीण उळे, अनिल बिक्कड, स्वप्निल शिनगारे, कुलदीप खंदारे, उतरेश्वर केदार यांनी वेगवेगळी ४ पथके निर्माण करून पकडले असून अन्य चार आरोपी फरार आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सावंत करताहेत.

बातम्या आणखी आहेत...