आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुली आणि स्त्रिया या मुळात सगळ्याच गुणात सर्वोत्तम असतात. त्यांना संधी मिळाली की त्याचे त्या सोने करतात परंतु शरीराच्या बाबतीत ती कमकुवत समजली जाते म्हणून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तिने स्वतःला शारीरिक दृष्ट्या मजबूत बनवले पाहिजे. मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. दिपाताई क्षीरसागर यांनी केले. सेल्फ डिफेन्स आणि मार्शल आर्ट असोसिएशन जिल्हा बीड. महाराष्ट्र राज्य आणि पोलिस स्टेशन शिरूर कासार यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील ८० मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा समारोप आणि प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.दिपाताई क्षीरसागर बोलत होत्या, त्या म्हणाल्या, आणि आपल्यावर आलेल्या संकटावर मात करणे शिकले पाहिजे, काळ बदलत आहे तस तसे मुली आणि स्त्रिया बाहेर आणि घरी ही सुरक्षित नाहीत ,या साठी मुलींना कोणता स्पर्श योग्य आणि कोणता स्पर्श अयोग्य याची जाणीव होणे आवश्यक आहे.
आपण शरीराने कमजोर आहोत हा भ्रम काढून टाकून त्यात सक्षम होण्यासाठी असे प्रशिक्षण घेणे आज काळाची गरज बनली आहे.या प्रसंगी बोलताना त्यांनी मेरिकोम ने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये असून देखील स्वतःला कसे सिध्द केले हे सांगितले. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली,या प्रसंगी विचारमंचावर पोलिस निरीक्षक माने, गोकुळ पवार,मुख्याध्यापक जायभाये,धाबे, कुलथे, महिला पोलिस अधिकारी दोडके, प्रशिक्षण देणारे डोंगर आणि त्यांची टीम डॉ. सानप , डॉ. शिंदे ,प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.