आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजात अस्तित्व निर्माण करण्यसाठी मुलींनी प्रगलभता वाढवावी. त्यांनी आत्मनिर्भर बनून आव्हाने स्विकार करण्याची क्षमता प्राप्त करावी असे मत बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांनी व्यक्त केले.
योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे स्मृतीन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आत्मभान शिबीरातील व्याख्यानात त्या बोलत होत्या. धसे म्हणाल्या, चांगल्या शरिरातच चांगले मन तयार होते त्यामुळे शिक्षण घ्यावेसे वाटते आणि शिक्षणामुळे प्रतिष्ठा निर्माण होते.
महिला आणि मुलींना हक्काची जाणीव होणे महत्वाचे असून ती झाल्यासच ती सक्षम होईल. एका चाकोरीत शिस्तबद्ध जगणारी महिला अनेक संकटे येऊनही कणखर राहते कारण स्वाभिमानाने जगणे तिला माहित आहे शिवाय आपले अस्तित्व आणि त्यातील रहाणे याचे परिपुर्ण शिक्षण महिलांनी माहित करून घेणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगिकार ही गोष्ट धोकादायक असून या पासून दुर राहणे गरजेचे आहे.
त्यामुळेयशाची गुरूकिल्ली म्हणजे आत्मविश्वास आहे. तो प्रत्येकाने निर्माण करण्याची गरज आहे. चांगल्या मैत्रिणींचा सहवास, शिस्तशीरपणा, नियमित अभ्यास संस्कारितपणा ह्या गोष्टी आपल्या जवळ असायला पाहीजेत म्हणजे जीवन चांगल्या पद्धतीने जगता येते.योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. एम.एस.लोमटे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्था पदाधिकारी, शिबारार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.