आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातील जामखेड च्या आठवडी बाजारातून बीडच्या कत्तलखान्यात निघालेल्या १८ गोवंशीय जनावरांची नेकनूर पोलिसांनी ३१ डिसेंबरला सुटका केली. खंडाळा फाटा (ता.बीड) येथे सापळा रचून टेम्पो पकडला. यावेळी तिघांना ताब्यात घेतले. शफीक मोमीन इस्माईल (३०), असद जाफर कुरेशी (१८),इलाईस सादेक कुरेशी (२४, तिघे रा.मोहमदीया कॉलनी, बीड) अशी आरोपींची नावे आहेत. जामखेड हून टेम्पोतून (एमएच ४३ एचडी- ४३१७) बीडला कत्तलखान्यात दाटीवाटीने कोंबून १८ जनावरे आणली जात असल्याची माहिती नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती.
पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर,उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हजारे यांनी उपनिरीक्षक मनोहर मनोहर आनवणे, हवालदार दीपक खांडेकर, अंमलदार बालासाहेब ढाकणे यांच्यासमवेत खंडाळा फाटा येथे सापळा लावून टेम्पो पकडला. त्यात ३ लाख ९४ हजार रुपयांची १८ गोवंशीय जनावरे आढळली. टेम्पोसह एकूण ८ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.जामखेडमध्ये कत्तलीसाठी जाताना जनवारांचे वाहन पोलिसांनी पकडले.
जनावरे चौसाळा येथील गोशाळेत केली रवाना
नेकनूर पोलिसांनी कत्तलखान्यात जाण्यापासून वाचविलेली १८ जनावरे चौसाळा (ता.बीड) येथील गोशाळेत पाठविली. तेथे त्यांच्या चारा- पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.