आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसींना आरक्षण देणे हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे यश आहे, असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री यांनी केले. ते परळी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमासाठी आले असता बोलत होते. चौहान म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेशच्या ओबीसी आयोगाने 4 महिने मेहनत घेतली. आम्ही ओबीसी आरक्षणासाठी आयोग तयार केला. त्यामुळेच मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्यात आम्हाला यश आले. आता महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
मुंडेंच्या आठवणींना उजाळा
गोपीनाथ गडावर बोलताना चौहान म्हणाले की, गोपीनाथ मुंडे आमचे मोठे बंधू होते. माझे महाराष्ट्रासोबत जवळचे नाते आहे. मला महाराष्ट्राने राजकारण शिकावले. त्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी मला राजकारण करण्यासाठी संधी दिली. मी महाराष्ट्राचा जावई देखील आहे. यामुळे मला महाराष्ट्र आपला वाटतो.
मध्यप्रदेशात मुलींना मोठे स्थान
शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मी महाराष्ट्राचा जावई आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या रूपात येथे आलो नाही. महाराष्ट्राशी माझे अतूट नाते आहे. मध्यप्रदेशात प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आम्ही मुलींचे पाय धुवून सुरुवात करतो. मुलगी आई-वडिलांना विसरू शकत नाही. मुलीने गोपीनाथगड बनवून वडिलांचे नाव आणखीनच मोठे केले. ही भूमी तुमचा केंद्रीय मंत्री म्हणून सत्कार करणार होती, पण तुम्ही न सांगता सोडून निघून गेले. तीन जून हा दिवस मी विसरू शकत नसल्याचेही ते म्हणाले.
मुंडेंनी अर्ध्यात साथ सोडली
शिवराजसिंह चौहान म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी आपली अर्ध्या रस्त्यात साथ सोडली. त्यांच्या सत्कारासाठी सर्व जनता तयार होती. मात्र, त्यांनी तो करण्याची संधीच कुणाला दिली नाही. ते इतक्या लवकर निघून जातील, असे आम्हाला वाटले नव्हते. अनेकदा वाटते की ते पुन्हा येतील आणि आम्हाला विचारतील कसे सुरू आहे, असे म्हणत त्यांनी आठवणींना उजाळा दिला. गोदीवरी नदीला पूर आलेला असताना गोपीनाथ मुंडे यांनी सरकारी मदतीची वाट न पाहता ते स्वत: कसे दाखल झाले ही सुद्धा सांगितले.
पंकजा मुंडेंचे कौतुक
पंकजा मुंडे आम्हाला मध्य प्रदेशात सरकार कसे चालवावे, काय करावे याचे मार्गदर्शन करत असतात, ऐवढे मोठे त्यांचे नेतृत्व असल्याचे म्हणत शिवराजसिंह चौहांन यांनी पंकजा यांचे कौतुक केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.