आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:विनायक विद्यालयाचा‎ खेळाडू सोहेलचा गौरव‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल‎ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता‎ दौड कार्यक्रमांतर्गत क्रीडा क्षेत्राच्या‎ जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा‎ सन्मान करण्यात आला. यामध्ये‎ कुस्तीपटू शेख सोहेलचा सत्कार‎ करण्यात आला.‎ विनायक माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववी‎ वर्गात शिकणारा शेख सोहेल याने‎ ५२ किलो वजन गटातील कुस्ती‎ स्पर्धेत राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय‎ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे यश‎ सुवर्णपदकासह प्राप्त केले होते.‎

याबद्दल शेख सोहेलसह‎ विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा‎ प्राचार्य प्रशांत पवळ, क्रीडा‎ मार्गदर्शक प्रल्हाद नरवडे यांचा‎ सन्मान जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल‎ सावे, जिल्हाधिकारी राधाबिनोद‎ शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य‎ कार्यकारी अधिकारी अजित पवार‎ या मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय एकता‎ दिनानिमित्त बीड जिल्हा क्रीडा‎ संकुलावर करण्यात आला .‎ विनायक माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक विद्यालयाच्या‎ विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उपस्थित‎ मान्यवरांनी विद्यालयाचे व‎ विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील‎ वाटचालीस हार्दिक शुभेच्छा‎ दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...