आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनसाळखी चोरट्यांनी लंपास:खंडेश्वरी यात्रेतून सोनसाखळी चोरी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावण दहनासाठी खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात गेलेल्या तरुणाच्या गळ्यातील सोनसाळखी चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अभिषेक बालाप्रसाद वैष्णव (रा. भक्ती कन्स्ट्रक्शन) हा तरुण बुधवारी दसऱ्याच्या निमित्ताने बीड शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी व रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. रावण दहनाचा कार्यक्रम पाहून खंडेश्वरीचे दर्शन घेत असताना चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील १ तोळे वजनाची ५० हजार रुपयांची सोनसाखळी लंपास केली.

बातम्या आणखी आहेत...