आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय सब ज्युनियर जम्प रोप स्पर्धा:श्रावणी काकडेने कोरले सुवर्ण, रौप्यपदकावर नाव

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री शिवाजी विद्यालयातील सातवीची विद्यार्थिनी श्रावणी श्रीराम काकडे हिने राष्ट्रीय सब ज्युनियर जम्प रोप स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई करून शाळेचा नावलौकिक मिळवला. जम्प रोप फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने कर्नाटक राज्यातील होस्पेट येथे २८ ते ३१ जुलैदरम्यान राष्ट्रीय सबज्युनियर जम्प रोप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातून विविध राज्यातील १५ ते १६ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात बीडच्या श्रावणी काकडे हिचा सहभाग होता. स्पीड व डबल अंडर रिले या क्रीडा प्रकारात श्रावणीच्या टीमने सर्व संघाला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. या वैयक्तिक क्रीडा प्रकारात श्रावणी काकडेला एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक प्राप्त झाले.

बातम्या आणखी आहेत...