आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णपदक ‎:राष्ट्रीय खेलो इंडिया निवड चाचणीमध्ये ‎ सुमीतकुमार भारस्कर यास सुवर्णपदक ‎

माजलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा राज्यातील बहादूर गड‎ येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खेलो इंडिया निवड‎ चाचणी कुस्ती स्पर्धेत शहरालगत असलेल्या शेला‎ पुरी येथील पै.सुमितकुमार भारस्कर याने ६८ किलो‎ वजन गटात सुवर्ण पदक पटकावून खेलो‎ इंडियामध्ये आपली जागा पक्की केली.

सुमित‎ कुमार अप्पासाहेब भारस्कर हा सध्या पुणे येथील‎ रुस्तुम ए हिंद अमोल बुचुडे कुस्ती केंद्रात कुस्तीचे‎ प्रशिक्षण घेत आहे.राष्ट्रीय खेलो इंडिया निवड‎ चाचणी कुस्ती स्पर्धा दरम्यान कोच म्हणून नरेन्द्र‎ कुमार हे होते तर, स्पर्धेत ६८ किलो वजन गटात‎ सुवर्णपदक पटकावून सुमित कुमार भारस्कर यांनी‎ जिल्ह्याची मान उंचावली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...