आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशादर्शक:सकस साहित्य हेच जीवनाला दिशादर्शक ठरते : तडेगावकर

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सकस साहित्य जीवनाला दिशादर्शक ठरते. साहित्य निर्मितीतून माणसांना जवळून ओळखता आले पाहिजे, असे प्रतिपादन जालना येथील कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी केले.

येथील श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कर्मचारी गणेश व्याख्यानमालेत “साहित्य निर्मितीच्या प्रेरणा”या विषयावर आपली भूमिका मांडताना डॉ. तडेगांवकर यांनी कांही साहित्यिकांच्या साहित्य कृतींवर प्रकाश टाकला व त्यांच्या जीवनापासून आपणाला कशी प्रेरणा मिळाली याचा पट उलगडून दाखविला. बहुतांश साहित्यिकांच्या साहित्य निर्मितीच्या मागे दुःख, अपमान, वेदना असतात प्रसंगी वाईटातून चांगली निर्मिती होते असे मत डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केले. त्यांनी प्रख्यात कवयित्री गीतकार शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या काव्य प्रतिभेवर प्रकाश टाकला कठीण परिस्थितीतून काव्य कसे निर्माण झाले हे सांगीतले. ब्राझील मधील भंगार गोळा करणारी कॅरोलिना , पाकिस्तानातील साराशा यांचा अत्यंत खडतर जीवन प्रवास सांगून भुक, दारिद्र्य, अन्याय अत्याचार या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा कशा ठरल्या हे सांगीतले. सरोजिनी बाबर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

स्त्रीयांचे प्रश्न , स्त्रीयां विषयीची कणव, ग्रामिण भागातील जीवन या काव्य निर्मितीच्या प्रेरणा आहेत हे सांगितले.मर्यादांचे कडी कोंडे मोडले पाहिजेत, कोणतेही काम मन लावून केले पाहिजे स्त्रीयांनी आपले उदात्तीकरण होतं असेल तर पुरुषी मानसिकता ओळखली पाहिजे व सावध झाले पाहिजे असे परखड मत व्यक्त केले. या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव कऱ्हाड यांनी भुषविले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गो. कुं. योगेश्वरी कन्या विद्यालयाच्या सहशिक्षिका क्षीरसागर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सहशिक्षिका शिवनंदा घोडके यांनी करून दिला. आभार प्रदर्शन लोंढे यांनी केले. या कार्यक्रमाला योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे, साहित्यिक म. सा.प.अंबाजोगाई शाखेचे प्रमुख दगडू लोमटे, सहसचिव डॉ साहेबराव गाठाळ, प्रा. भीमाशंकर शेटे प्रा. एस. के. जोगदंड, कार्यकारिणीचे सदस्य, प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर, डॉ. आर. डी. जोशी, रमण देशपांडे, योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पाठक, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना परोपकारी व नागरिक उपस्थित होते.

कर्मचारी गणेश मंडळाची व्याख्यानमाला आदर्श
अंबाजोगाई या शहराची ओळख ही मराठवाड्याचे पुणे अशी आहे. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईकडे पाहिले जाते. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कर्मचारी गणेश मंडळाने गणेश व्याख्यानमालेच्या निमित्ताने विविध मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी अंबाजोगाईकरांना उपलब्ध करुन दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...