आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:या भागात चांगले दर्जेदार रस्ते; ब्रिझ प्री प्रायमरी स्कुलचे डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बाळराजे नगर, पालवण चौक परिसरात ब्रिझ प्रि प्रायमरी स्कूलचे उद्घाटन युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी बोलतांना डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, पालवण चौक परिसरात आता रहिवाशींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात चांगले दर्जेदार रस्ते झाल्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढतच आहे. यामुळे येथे लहानग्यांसाठी परिसरात छोट्या शाळेची आवश्यकता भासत होती. ब्रिझ प्रि प्रायमरी स्कुलच्या माध्यमातून ती कमतरता भरून निघत आहे. अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी शिक्षक नेते उत्तमराव पवार, माजी बांधकाम सभापती विनोद मुळूक, माजी गरसेवक गणेश वाघमारे, भीमराव वाघचौरे, भैय्यासाहेब मोरे, विकास जोगदंड, सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई तोकले, डॉ.अशोक गायकवाड, मनोज मस्के, अमर विद्यागर यांच्यासह सुनिल डोंगरे, ब्रिझ प्रि प्रायमरी स्कुलचे संचालक डॉ.नंदकुमार उघाडे, प्रा.ज्योती शिनगारे यांच्यासह कर्मचारी वृंद व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...