आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोपीनाथ मुंडे जन्मदिन सोहळा:कोरोनाचे नियम पाळून गोपीनाथ गडावर होणार दर्शन; गर्दी टाळून सर्वांनी काळजी घेण्याची पंकजा मुंडेंची सूचना

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करा, पंकजा मुंडे यांचे आवाहन

कोरोना महामारीच्या संकटात सामाजिक उपयोगता आणि आवश्यकता लक्षात घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि १२ डिसेंबर हा जन्मदिवस साजरा करावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले आहे. यंदा गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, सर्वांनी स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात समाज माध्यमाद्वारे दिलेल्या संदेशात पंकजा मुंडे म्हणाल्या की, १२ डिसेंबर हा दिवस आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरणा, ऊर्जा व जीवनामध्ये आशा देणारा दिवस आहे. मुंडे साहेब हयात असताना आपण सर्व हा दिवस वेगवेगळ्या पध्दतीने व उत्साहाने साजरा करतो होतो. आज ते हयात नाहीत, परंतू आपल्यासाठी ते स्वाभिमानाची प्रेरणा देणारे संघर्षाचा महामेरू आहेत. १२ डिसेंबर हा जन्मदिवस आणि ३ जून हया स्मृतिदिनी आतापर्यंत गोपीनाथ गडावर मोठ मोठे नेते, मंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, छत्रपती उदयनराजे व संभाजीराजे आदींनी उपस्थित राहून संघर्षाच्या या जीवन प्रवासाला आदरांजली अर्पण केली. यंदा मात्र दरवर्षी सारखा मोठा कार्यक्रम नसणार आहे.

रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करा

यंदा सर्व सामान्य जनता कोरोनाच्या संकटात सापडली आहे, अशा परिस्थितीत कोणालाही त्रास न होता वेगळ्या पध्दतीने १२ डिसेंबर हा दिवस साजरा करायचा आहे. मोठे नेते, मोठी सभा, गर्दी टाळायची आहे. मी स्वतः १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी गडावर दर्शन घ्यायचे आहे. महामारीच्या या संकटात सामाजिक उपयोगता आणि आवश्यकता लक्षात घेऊन सर्वांनी १२ ते १५ डिसेंबर दरम्यान ठिक ठिकाणी केवळ आणि केवळ रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, असल्याने मुंडे साहेबांच्या जन्मदिवशी असे समर्पित कार्यक्रम घ्यावेत व त्याचे फोटो आणि कार्यक्रमाचे वर्णन सोशल मिडियावर द्यावेत असे आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser