आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृतिदिन. त्यानिमित्त गोपीनाथ गडावर स्मृतिदिनाचा कार्यक्रम होत आहे. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर दाखल झालेत. दरम्यान राज्याचे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते धनंजय मुंडे देखील गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर पोहोचले. ते गोपीनाथ मुंडेच्या समाधीसमोर नतमस्तक झाले आणि सध्या मुंडे साहेब असते, तर वेगळेच राजकीय वातावरण राहिले असते, असे भावुक उदगार काढले.
तो आवाज कानात घुमतोय...
धनंजय मुंडे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे हे आमच्या संघर्षाच्या काळात आयुष्यातले अनेक वर्ष आमच्यासोबत सावलीसारखे सोबत होते. त्यांनी सामान्य माणसांच्या संघर्षासाठी त्यांनी आवाज उठवला होता. तो आवाज आजही माझ्या कानात घुमतोय. त्यांनी उसतोड मजुरांसाठी पाहिलेले स्वप्न, बीड जिल्ह्यासाठी पाहिलेले स्वप्न मी आज सत्तेत असताना ते पूर्ण करायचे प्रयत्न करतो आहे.
उसतोड मजूर महामंडळ...
धनंजय मुंडे म्हणाले, उसतोड मजूर महामंडळासाठी अथक परिश्रम घेऊन आज कुठेतरी ते महामंडळ अस्तिवात आणले. हे महामंडळ पिढ्यानपिढ्यांसाठी चांगले चालावे यासाठी आम्ही विधिमंडळामध्ये निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये 1 टन जरी ऊस कुठे गाळप झाले तर 10 रुपये हे कारखान्याने उसतोड कामगारांच्या महामंडळाला देणे आणि सरकारने देखील 10 रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला. उसतोड कामगारांच्या प्रति गोपीनाथ मुंडे यांच्यात असलेला प्रेम ते गेल्यानंतरही मी याठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
घटना घडल्या नसत्या
धनंजय मुंडे म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जर आज आपल्यात असते तर, गेल्या चार-पाच वर्षांत महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना घडल्या नसत्या. राज्यात एक वेगळेच सकारात्मक चित्र दिसले असते. शरद पवार यांनी देखील याआधी गोपीनाथ गडावर येऊन दर्शन घेतलेले आहे. सुप्रिया सुळेंनी देखील स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्या आहेत. राजकीय विचारधारेचा विषय वेगळा असून एखाद्या संघर्षातून निर्माण झालेल्या नेतृत्वासमोर नतमस्तक होणे हे कुठल्याही आजच्या पिठीला, राजकीय नेत्याला स्वभाविक आहे.
माझ्या वडिलांसोबत वाद घातला
धनंजय मुंडे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे 1978 साली जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी उभे राहिले. याच निवडणुकीत त्यांनी मला जीवनातली पहिली राजकीय निवडणूक लढवायला लावली. त्याच जिल्हा परिषद गटातून मी देखील उभा राहिलो पाहिजे म्हणून, त्यांनी माझ्या वडिलांसोबत वाद घातला. मला पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी उभे केले. तिथून खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली, अशी आठवण त्यांनी सांगितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.