आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा  परळीत गौरी-गणपती स्पर्धा

परळी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि द टर्निंग पॉइंट यांच्या वतीने शहरात गौरी-गणपती स्पर्धा महोत्सव आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी २ हजार ३९१ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. शहरातील स्थानिक कलाकार व गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला आहे. मागील स्पर्धेच्या तुलनेत यंदा स्पर्धेसाठी दुप्पट नोंदणी झाली. महालक्ष्मी देखावा स्पर्धेसाठी १४९०, घरगुती गणेश सजावट ८६०, बाल गणेश मंडळ देखावा २८ आणि १३ स्पर्धकांनी गणेश मिरवणूक देखाव्यासाठी नोंदणी केलेली आहे. स्पर्धकांना रोख बक्षिसे, स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

पंकजा मुंडे, डाॅ. प्रीतम मुंडे करणार पाहणी : माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे सोमवारी (५ सप्टेंबर) गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी ९ पासून स्पर्धेत सहभागी स्पर्धकांच्या घरी जाऊन स्वतः देखाव्यांची पाहणी करणार आहेत. त्याच बरोबर ९२ तज्ज्ञ महिला परीक्षकांची टीम स्पर्धेच्या परीक्षणासाठी सज्ज झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...