आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज स्मृतिदिन:​​​​​​​आईसाहेब, तुम्ही सांगाल तेव्हा मी संस्थानवर दर्शनासाठी येईन, महंत राधाताई महाराज सानप यांनी जागवल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी

पाटोदा16 दिवसांपूर्वीलेखक: महेश बेदरे
  • कॉपी लिंक
  • लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी नेहमीच साधू-संतांचा आदर केला आहे

‘आईसाहेब माझ्या वेळेचा प्रश्नच नाही, तुम्ही तुमच्या वेळेनुसार कार्यक्रमाचा मुहूर्त काढा, तुम्ही सांगाल तेव्हा मी संस्थानवर दर्शनासाठी येईन. हे संस्थान भविष्यात खूप मोठे होणार आहे. माझ्याकडून जी काही सेवा शक्य आहे, ती मी करणार आहे, तुम्ही काळजी करू नका’ हे उद््गार आहेत २००९ मध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे व श्रीक्षेत्र मीराबाई संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज यांच्यात झालेल्या संवादाचे. लाेकनेते गाेपीनाथ मुंडे यांची गुरुवारी स्मृतिदिन अाहे, त्यानिमित्त महंत राधाताई महाराज यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना लोकनेत्यांच्या आठवणी जागवल्या...

महंत राधाताई महाराज म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सर्व संत-महंतांचा नेहमी आदर व सन्मान केला. असा अद्वितीय लोकनेता पुन्हा होणे नाही. श्रीक्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे कायमच ऋणानुबंध होते. ते वेळ काढून दर्शनासाठी यायचे. २००९-१० च्या दरम्यान संस्थानात विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता. मुंडेंच्या हस्ते हा कार्यक्रम व्हावा अशी सर्वांचीच इच्छा होती. आम्ही त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील कार्यालयात गेलो.

आत निरोप पाठवला व बाहेर आमच्या मनात धाकधूक होती की, काही क्षणांतच कार्यालयात बोलावले व आत जाताच त्यांनी नम्रपणे दर्शन घेऊन आदर-सन्मान केला. एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचलेला माणूस एवढा नम्र असू शकतो हे आम्ही पाहिले. त्यांनी अत्यंत आस्थेने आमची चौकशी केली, अशा आठवणी ताज्या केल्या.

अनेकांना नेते केले म्हणूनच तेही लोकनेते झाले
गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत संघर्षच वाट्याला आला. त्यांनी अनेकांना नेते केले म्हणूनच तेही लोकनेते झाले. संघर्षामुळे गोपीनाथ मुंडे यांच्यावर जात, धर्म, पंथ व पक्ष यापलीकडे जाऊन लोकांनी प्रेम केले आणि त्यांनीही नेहमीच त्या प्रेमाची उतराई केल्याचे राधाताई महाराज सानप म्हणाल्या.

मुंडे साहेबांनी संस्थानाच्या विकासासाठी कायम सहकार्य केले
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना संत मीराबाईंनी आशीर्वाद दिले होते. संस्थानशी त्यांचे ऋणानुबंध कायम राहिले. त्यांच्या खासदार फंडातून संस्थानची अनेक विकासकामे झाली. २०१० मध्ये संस्थानवरील कार्यक्रमासाठी त्यांच्यासमवेत पंकजा मुंडे होत्या. त्या वेळी त्यांनी संस्थानच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून संत मीराबाईंच्या पुण्यतिथी सोहळ्याला दरवर्षी येऊ व पंकजादेखील येतील असे सांगितले होते. आता त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे किंवा खासदार डॉ. प्रीतम मुंडे या दरवर्षी येथे येतात.

बातम्या आणखी आहेत...